बीड मध्ये राष्ट्रवादीने समीकरणं बदलली; माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात!

Spread the love

बीड | भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जबर धक्का दिला आहे. त्यांच्या होमग्राउंडवर भाजपच्या ताब्यात असलेली माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतली आहे. हा पंकजासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने पूर्णपणे माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची बिनविरोध निवड झाली. भाजप नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बरखास्त केल्यावर आज नगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या शेख मंजूर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भाजपची सत्ता असलेली नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने कुतुहलाचा विषय ठरला आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करुन राजकारणात नव्याने मुसंडी मारण्याचा इशारा दिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधूनच जबर धक्का मिळाला आहे. माजलगाव नगरपालिका भाजपच्या ताब्यात होती, मात्र नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संधी साधून भाजपच्या गोटातील काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लावले आणि आपला गड मजबूत केला.

भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला होता, मात्र भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन पंकजा मुंडेंनाच जबर धक्का दिला. मोहन जगताप आघाडीचे ४, राष्ट्रवादीचे ७, भाजपचा १ आणि शिवसेनेचे २ असे १४ संख्याबळ राष्ट्रवादीचे होते. सहाल चाऊस गटाच्या ४ नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने एकूण संख्याबळ १८ झाले. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.