जिल्हा परिषद सदस्य प्रविणभैय्या माने यांच्या पुढाकारातून कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या बबन तरंगेच्या कुटुंबियांला दीड लाख रुपयांची मदत!

Spread the love

इंदापुर | काळाचा घाला आल्यावर त्यापुढे कुणाचीही मात्रा चालत नाही. निसर्गाच्या मर्जीपुढे आपण सर्व सजीव हतबलच असतो, त्यामुळेच समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देणे हेच आपले कर्तव्य आहे. विश्वावर कोसळलेली आपत्ती कोरोनाने कित्येकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले.

अशीच एक मनाला चटका लावणारी घटना आपल्या इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथेही घडली. तरंगवाडी ग्रामपंचायत येथे शिपाई तर सोनाई डेअरीमध्ये पार्टटाईम कार्यरत असणारे कर्मचारी बबन तरंगे यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. बबन तरंगे म्हणजे घरातील कर्ता पुरुष. आपली हालाकीची परिस्थिती बदलण्यासाठी दिवसरात्र मेहनत करुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणारे बबन यांच्या जाण्याने तरंगे कुटुंबावर मोठं संकट कोसळले. बबन तरंगे यांच्या जाण्याने तरंगे कुटुंबात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघण्यासारखी आहे. पण या कठिण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली जबाबदारी समजत पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रविणभैय्या माने यांनी तरंगे यांच्या मातोश्री कामीनी महादेव तरंगे यांच्याकडे मदत म्हणून दीड लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला.

बबन तरंगे यांच्या पश्चात आई कामिनी महादेव तरंगे, पत्नी वैशाली बबन तरंगे, ६ महिन्यांचा मुलगा प्रणव व भाऊ अनिल महादेव तरंगे असा परिवार आहे आज बबन तरंगे यांच्या मातोश्रींना चेक देताना तुकाराम तात्या करे माजी उपसरपंच तरंगवाडी, नानासाहेब नरुटे माजी सरपंच शिरसोडी, संतोष तरंगे, गणेश मराडे, अमोल मराडे सर हे मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.