‘माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळ, ठाकरे सरकार जबाबदार’; चिठ्ठी लिहून एसटी कंडक्टरची आत्महत्या!

Spread the love

प्रतिनिधी प्रकाश भगेकर

जळगाव | एसटी डेपोत काम करणाऱ्या एसट कंडक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहत्या घरी गळफास घेत मनोज चौधरी यांनी जीवन संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी एक चिठ्ठी लिंहून ठेवली. या चिठ्ठीमध्ये मनोज चौधरी यांनी आत्महत्येला एसटी महामंडळ आणि ठाकरे सरकारला जबाबदार धरले आहे. एसटी कर्मचाऱ्याचे आत्महत्येने संतप्त एसटी कर्मचारी जळगाव डेपो बंद करण्याच्या तयारीत आहे. मनोज चौधरी यांच्या आत्महत्येने जळगाव हादरले आहे.

कंडक्टर मनोज चौधरी यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मनोज चौधरी यांनी चिठ्ठी लिहली. यामध्ये “एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.

यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना). माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा” असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीतून मुक्तता मिळावी यासाठी जळगाव एसटी डेपोचे कंडक्टर मनोज चौधरी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, मनोज चौधरी यांच्यासह अजून एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.

रत्नागिरी आगारात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

रत्नागिरी आगारात कंडक्टर पांडुरंग संभाजीराव गडदे यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. पांडुरंग गडदे हे मुळचे बीडमधले रहिवाशी आहेत. ८ नोव्हेंबरला नांदेड ते रत्नागिरी अशी नियोजित कामगिरी करून गडदे आले होते. आगारात आल्यानंतर व्यवस्थापकांकडे त्यांनी संपूर्ण हिशेब दिला. त्यानंतर ते आगारातील चालकांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुपारी ४ च्या सुमारास त्यांचे रुम पार्टनर पी. ए. तांदळे हे गडदे यांना उठवण्यासाठी गेले असता रुमचा दरवाजा वाजवल्यानंतरही रुममधून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तांदळे यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी रुमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. त्यावेळी गडदे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तांदळे यांनी यांनी या घटनेची माहिती आगार नियंत्रक रमेश केळकर यांना माहिती दिली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.