भाजपला ताकद दाखवून देतो; उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसे?

Spread the love

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ४० वर्षांची भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून भाजपची ताकद एकमेव खडसे होते. ती ताकद आता राष्ट्रवादीकडे आली आहे. एकनाथ खडसे यांनी तशी गर्जनाच आता केली आहे. आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली.

उत्तर महाराष्ट्रात आता राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास सुरुवातदेखील झाली आहे. आज जळगावात भाजपच्या ६० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रावेर तालुक्यातील ६० भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाली आहे.

यानंतरही जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली. दरम्यान, हौसेगौसेच पक्ष सोडतील असे भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.