दिवाळीनंतर खानदेशात मोठा राजकीय भूकंप? एकनाथ खडसे!

Spread the love

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केल्यानंतर खानदेशात भाजपमधून राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढत चालले आहे. येथील असंख्य कार्यकर्त्यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी दिवाळीनंतर जळगाव जिल्ह्यात भाजपमधून राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाच्या मोठ्या सोहळ्याचे नियोजन केल्याची घोषणा केली आहे.

या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, नाथाभाऊ गेल्याने भाजपला फरक पडत नाही असे भाजपचे नेते म्हणत आहेत. असे असले तरी रोज बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पक्ष सोडून जाऊ नका, अशी विनंती भाजप कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी करीत आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आपले पक्षप्रवेश सोहळे असेच सुरूच राहणार असून, दिवाळीनंतर मोठ्या प्रवेश सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत.

कार्यकर्त्यांच्या नाराजीचाच हा परिणाम आहे, असे खडसे यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. जळगाव शहरातही पक्षाच्या बळकटीची नवीन रचना करण्यात येत असून, त्याची सुरुवात महापालिकेपासून करण्यात येणार आहे. महापालिकेतील चार स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात येत असून, त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. उपमहापौरपदासाठी चार जण इच्छुक असून, त्यांच्या नावाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.