शिक्रापूर मध्ये शिवजयंती निमित्ताने सह्याद्री युवा मंच व श्री शिवशंभू ट्रस्ट यांच्या वतीने रक्तदान शिबिरात 143 जणांनी केले रक्तदान!

Spread the love

शिक्रापूर | काल शिवजयंती निमित्ताने सह्याद्री युवा मंच श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिर रविवार दि.१४/०२/२१ रोजी. .१०:०० वा.सुरुवातझाली.या रक्तदान शिबीरासाठी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग दाखविला. खूप लोकांनी हिरिरीने सहभाग नोंदवला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. विक्रम साळुंखे ( सहा. पोलीस निरीक्षक शिक्रापूर ) मा. अमोल खटावकर ( पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर) मा.सौ.पुनम जाधवमॅडम (पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर) मा. मयुर करंजे (अध्यक्ष रोटरी क्लब शिक्रापूर) डॉ. धनंजय लोंढे (सचिव रोटरी क्लब शिक्रापूर) मा. ब्रह्मानंद पोवार,मा. कृष्णा विरोले पाटील (पोलीस पाटील शिक्रापूर) श्री. जयदीप शेठ शिंदे ॲड. सौ सारिका वाबळे मा. सतिश पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन रक्तदान शिबिराची सुरुवात झाली.

भव्य रक्तदान शिबिरामध्ये लोकांचा प्रचंड उत्साह पाहता दिवस अखेर 140 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पारपाडले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करून शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून लोकांना मोफत बॅग दिली जाते त्यामळे शिवशंभूट्रस्ट सोबत यापुढे नेहमी सह्याद्री प्रतिष्ठान रक्तदानाची चळवळ उभी करून साथ देईल यात शंका नाही, सह्याद्री युवामंच शिक्रापूरच्या या समाजउपयोगी उपक्रमाचे सर्वच स्तरावरून स्वागत होत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे सह्याद्री युवा मंचचे ब्रीद आहे.

आज या उपक्रमामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना  लाख रुपयांचा  अपघात विमा शिवचरित्राच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. शिक्रापूर येथील डॉ. शरद लांडगे यांनी या उपक्रमासाठी स्वतःच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून देऊन युवा मंचला मोलाचेसहकार्य केले. सह्याद्री युवा मंच तर्फे सर्व प्रमुख पाहुणे रक्तदात्यांचे आभार मानले. आणि या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहकार्य करणाऱ्यासर्वच युवा मंचच्या सदस्यांचे आणि सर्व शिवशंभू भक्तांचे तसेच शिवशंभू ट्रस्टचेही विशेष सहकार्य लाभल्यामळे आभार मानण्यात आले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.