बेकायदेशिररित्या गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या हडपसर पोलीसांनी आवळल्या मुरक्या!

Spread the love

हडपसर | मा.वरिष्ठांच्या आदेशान्वये हडपसर पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलींग पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदिप सोनवणे पो.ना. नितीन मुंढे, पो. ना. समिर पांडुळे, पो.शि. निखील पवार, पो.शि. प्रशांत दुधाळ, पो.शि. शशिकांत नाळे यांचेसह करीत असताना, पोलीस नाईक ७३१७ मुंढे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम लोखंडी पुलाजवळ गोंधळेनगर, हडपसर पुणे येथे सार्वजनिक रोडवर त्याचे बुलेट मोटार सायकल यावर बसलेला असुन त्याचेकडे पिस्टल आहे. अशी त्याचे वर्णनासह खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीचा आशय मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम साो हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन बातमी खात्री करुन योग्य ती कारवाई करणेबाबत सुचना व मुजफल आदेश दिल्याने सदर भागात सापळा लावुन रात्री २०.४० वा.चे सुमारास अजय दिलीप लाळगे ऊर्फ डी वय २६ वर्षे रा. सर्व्हे नं. १३, भगतसिंग कॉलनी, गोंधळेनगर हडपसर पुणे यास पकडून त्याची अंगझडती घेता, त्याचे कब्जातुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा माल मिळून आले तेंव्हा त्याचेविरूध्द हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १४८/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.तसेच सदरची कारवाई करीत असतांना एक तडीपार आरोपी नामे विनित रविंद्र इंगळे वय २१ वर्षे रा राहुल कॉलनी एकविश्व कॉप्लेक्स जवळ सातववाडी हडपसर पुणे.यास २ वर्षे करीत पुणे आयुक्तालयातुन तडीपार करण्यात आलेला असातांना तडीपारी आदेशाचा भंग करुन मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोनि. (गुन्हे) श्री. राजु अडागळे, पोनि (गुन्हे) श्री. दिगबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, पोलीस नाईक सैदोबा भोजराव, समिर पांडुळे, संदिप राठोड, अविनाश गोसावी, नितीन मुंढे, पोलीस शिपाई शशिकांत नाळे, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास हडपसर पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक एस बी जाधव हे करित आहेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.