निमगाव केतकी ग्रामपंचायतिची सत्ता युवा पिढीच्या हाती; सरपंच प्रविण डोंगरे तर उपसरपंच पदी सचिन चांदणे!

Spread the love

इंदापूर | निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रविण दशरथ डोंगरे व उपसरपंच पदी सचिन दत्तात्रय चांदणे यांची बहुमताने निवड झाली. आजच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सुवर्णयुग ग्रामविकास पॅनलच्या वतीने सरपंच पदासाठी प्रवीण दशरथ डोंगरे व उपसरपंच पदासाठी सचिन दत्तात्रेय चांदणे यांनी आपले अर्ज दाखल केले. तर भाजप पुरस्कृत श्री केतकेश्वर ग्रामविकास पॅनलच्या वतीने सरपंचपदासाठी रीना सुभाष भोंग व उपसरपंच पदासाठी अर्चना अनिल भोंग यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या लढतीत राष्ट्रवादीचे प्रवीण डोंगरे यांनी 17 पैकी 12 मते मिळवत सरपंच पदावर आपले नाव कोरले तसेच उपसरपंच पदासाठी सचिन चांदणे यांनी 17 पैकी 11 मते घेऊन विजय संपादित केला.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री राखुंडे यांनी सरपंच पदासाठी प्रवीण दशरथ डोंगरे व उपसरपंच पदासाठी सचिन दत्तात्रय चांदणे यांची नावे जाहीर करताच फटाक्यांची आतिषबाजी मध्ये व गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादीने
प्रथमच ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करून नवीन इतिहास रचला आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. राखुंडे यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप व गाव कामगार तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांनी सहाय्य केले. नवनिर्वाचित सरपंच प्रवीण डोंगरे यांचे वडील दशरथ डोंगरे हे 2006 मध्ये गावचे सरपंच होते. तब्बल 14 वर्षानंतर त्यांचा मुलगा गावचा गावकारभारी बनला आहे

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.