शिवसंस्कर प्रतिष्ठान व शिवशंभू ट्रस्ट तर्फे निमगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न; प्रथमच झालेल्या शिबिरात 96 रक्तदात्यांनी नोंदविला सहभाग!

Spread the love

करमाळा | करमाळा तालुक्यातील निमगाव(ह) येथे शिवसंस्कार प्रतिष्ठान च्या वतिने ३१ मार्च रोजी तिथी प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला असुन या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात तब्बल ९६ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना आभिवादन केले .

शिवसंस्कार प्रतिष्ठान च्या वतिने दरवर्षी साजरा करण्यात येणारे शिवजन्मोत्सव सोहळ्यात व्याख्यान, पोवाडे, भारुड, किर्तन तसेच विद्यार्थ्यांना शालेयउपयोगी साहित्य वाटप, खाऊ वाटप व पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन केले जाते, पंरतु या वर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतुन रक्तदान शिबिर आयोजित करुन हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

रोजी सकाळी ठीक ०९ वाजता ध्वज पुजन व शिवाजी महाराजांच्या मुर्तीस अभिषेक करूण रक्तदान शिबीराची सुरवात करण्यात आली तसेच या रक्तदान शिबिरास शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट चे विषेश सहकार्य लाभले असून ट्रस्ट कडून प्रत्येक रक्तदात्यास सन्मान पञ देण्यात आले व गरज भासल्यास मोफत रक्त पिशवी देणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंस्कार प्रतिष्ठान चे ऋषीकेश चव्हाण, मा. ग्रा.सदस्य अमोल भोसले ,सोमनाथ हालकरे, विक्रम कुंभार, दादासाहेब भोसले आदींनी परिश्रम घेतले
या वेळी नानासाहेब निळ सर, शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट चे तालुकाध्यक्ष संजय सरडे,तालुका उपाध्यक्ष अंगद भांडवलकर, युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे  हनुमंत नीळ, संतोष जगदाळे, बालाजी इंगळे, जगदीश निळ पाटील, सिद्धेश्वर जगदाळे, राजेंद्र गोसावी आदि उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालुन दिलेले सर्व नियम व सुचनांचे काटेकोर पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला शिवसंस्कर प्रतिष्ठान तर्फे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास सॅनीटायझर ,मास्क व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.