प्रविण माने यांच्या वतीने, रमजान ईद निमित्ताने २५०० लिटर दुधाचे वाटप

Spread the love

इंदापूर | कोरोना आता ही काही तात्पुरती चिंतेची बाब राहीली नसून जन सामान्यांच्या रोजच्या आयुष्याला वळण देणारी एक कडी ठरत आहे. माणसांना माणसांपासून विलग होऊन राहणे सध्यातरी कोरोनाचे एवढे एकमेवच निदान आहे.

असे असले तरी नागरिकांच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घटना व समारंभ, सणवार या गोष्टी या आजारापासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या आचार संहितेच्या चौकटींत राहून आपण आपल्या कुटुंबासमवेत आपापल्या घरांतून हे सण साजरे करूच शकतो.

कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक गणितं कोसळली असली तरी सण साजरा व्हावा व या संकटाच्या काळातही नागरिकांच्या आयुष्यात गोडवा मिसळता यावा या उद्देशातून मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या माध्यमातून सोनाई परिवाराच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी ३००० लिटर दुधाचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सर्व नागरिकांना इंदापूर शहरातील श्रीराम चौक व इंदापूर कसबा अशा विविध भागातून दूध वाटप करण्यात आले असून, याही वेळी सर्व नागरिकांना आपापली काळजी घ्यायला सांगत ज्येष्ठांना कोरोना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याविषयीचे आव्हान माने यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

या दूध वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी समीर पठाण, निहाल पठाण, आक्रम शेख, मोआज पठाण, निहाल शेख व इतर मान्यवर सहकारी उपस्थित होते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.