संजय गांधी निराधार योजना शासकीय समिती तालुकाअध्यक्षपदी सागरबाबा मिसाळ यांची निवड!

Spread the love

इंदापूर | इंदापूर तालुका संजय गांधी निराधार योजना शासकीय समिती तालुकाध्यक्षपदी सागर बाबा मिसाळ यांची निवड झाली.या निवडीबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मिसाळ यांचा भरणेवाडी ता.इंदापूर येथे सन्मान करण्यात आला.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मिसाळ यांचे अभिनंदन करून तालुकाध्यक्षपदी यशस्वी कामगिरी करावी असे मत व्यक्त केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, विक्रम निंबाळकर ,सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे ,कालिदास राऊत, सोमनाथ मोहिते, गणेश सांगळे, संभाजी बनसोडे, अंबादास लांडगे, तुकाराम खाडे आदी उपस्थित होते.

यावेळी सागर मिसाळ यांनी सांगितले ती राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना शासकीय समितीच्या अध्यक्षपदी काम करताना तालुक्यातील गोरगरीब,अंध, अपंग ,ज्येष्ठ नागरिक,अनाथ ,विधवा,निराधार,परितक्त्या यांच्यासाठी गावस्तरावर या योजनेच्या शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेमधून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला सर्वसामान्य नागरिक व गरजू लाभार्थ्यांना मदत करण्याचे संधी तालुकाध्यक्ष पदाच्या रुपाने मिळाली असल्याने पदाचा योग्य सन्मान ठेवून तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.