इंदापुर येथील 17 पॉझिटिव्ह कैद्यांची रवानगी शासकीय वसतिगृहात; महामेट्रो न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट!

Spread the love

इंदापुर | इंदापूर मध्ये 25 रोजी झालेल्या तपासणीत तब्बल 17 कैदी कोरोनाग्रस्त आढळले, आज देखील एक कैदी कोरोनाग्रस्त आढळला असून हे सर्व काही एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे कोरोनाग्रस्त वाढतायेत व त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले नसल्याची तक्रार आज संध्याकाळी मानवी हक्क आयोगाकडे झाली आणि त्याची माहिती व बातमी महामेट्रो न्युज मध्ये प्रसारित होताच काही तासांतच सूत्रे हलल्याचे समजले.

रात्रीच्या अंधारात या सर्व कैद्यांना इंदापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अॅड. तुषार झेंडे पाटील यांनी आज संध्याकाळी यासंदर्भातील तक्रार मानवी हक्क आयोगाकडे केली होती. मानवी हक्क आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून या संदर्भातील योग्य ती चौकशी होण्याची शक्यता आहे, मात्र याची तक्रार झाली अशी बातमी प्रसिद्ध होताच इंदापूर तालुक्यातील प्रशासनाने वेगाने सूत्रे हलवली व संध्याकाळी उशिरा दोन रुग्णवाहिका मधून या सर्व कैद्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये
हलविण्यात आले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.