एकीकडे कोरोनाचे भयंकर संकट; तर दुसरीकडे मंदिरावरून शिवसेना-भाजप मध्ये राजकारण तापले!

Spread the love

मुंबई | कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन असलेलं राज्य एकीकडे अनलॉक होत असताना दुसरीकडे मात्र भाजप सरकार मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलं आहे. यामुळे कोरोनाचं संकट बाजूलाच पण सत्ताधारी आणि विरोधक असं सत्तानाट्य उभा महाराष्ट्र पाहत आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संकटामध्ये भाजपने राज्यभर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केलं. यावर आज सामनातून जहरी टीका करण्यात आली. याच टीकेला आता भाजपकडूनही चोख प्रत्यूत्तर आलं आहे. ‘ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमुळे फुलतो त्यांची वृत्तपत्रं मंदिरं बंदीच्या बाजूनेच बोलणार’ अशी आक्रमक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या आंदोलनावर जहरी टीका करण्यात आली. ‘भाजपचं घंटानाद आंदोलन हे धार्मिक होतं की राजकीय?’ असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला. त्यावर भातखळकर यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

‘दारुची दुकानं उघडल्यानंतर जसा पैसा येतो तसा पैसा मंदिरांमधून मिळाला असता तर यांनी मंदिराचे दरवाजे कधीच सताड उघडे ठेवले असते’ अशीही घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे. मंदिरांची टाळी उघडायला हवीत पण राजकिय मन:शांतीसाठी नकोत…आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे! असं आज सामना अग्रलेखातून शिवसेनेनं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं. राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं घंटानाद आदोलन केलं. या आंदोलनावेळी फिजीकल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजवातच भाजपने आंदोलन केलं. त्यामुळे त्यांनी केलेला मंदिर उघडल्यावर देव दर्शनासाठी भाविक फिजीकल डिस्टंसिंगचे नियम पाळतील हा दावा प्रत्यक्षात अंमलात येण्यास अनेक प्रश्नं उपस्थित करणारा आहे. असं असताना मंदिरं उघडण्याचा धुसमुसळेपणा विरोधकांनी करण्याआधी विरोधकांनी महाराष्ट्रातील स्थिती समजून घेणं महत्वाचं आहे. असे शहाणपणाचे डोस आज सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाला देण्यात आलेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.