एकीकडे वृक्ष लागवडीसाठी तळमळ, तर दुसरीकडे निमगाव केतकी मध्ये वृक्षांची कत्तल करून अतिक्रमण; प्रशासनाचे दुर्लक्ष?

Spread the love

प्रतिनिधी: सुरेश मिसाळ, इंदापुर
इंदापूर | निमगाव केतकी येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग असणा-या सराफवाडी रस्त्याच्या कडेला प्रसिद्ध सिनेअभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केले, मात्र ही झाडे तोडली गेली असून त्या जागी अतिक्रमण करण्याची स्पर्धा लागली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असून नागरिकांत संताप आहे. यावर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या महासंकटाने साजरा झाला नाही, पण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व भावी पिढीला वृक्षांचे महत्व होण्यासाठी निमगाव केतकीत इंदापूर-बारामती राज्य मार्गावर सराफवाडी रस्त्याच्या कडेला गेल्या दोन महिन्यापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त ह.भ.प. मोरे महाराज व वृक्षप्रेमी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते जांभूळ, वड,पिंपळ व इतर वृक्षांचे रोपन केले. यावेळी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी सयाजी शिंदे यांनी ही झाडे चांगल्या पद्धतीने जोपासावीत असे आवाहन केले, मात्र काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणा-या या जागेत नागरीकांनी अतिक्रमणांचा सपाटा लावला आहे. काही नागरिकांनी त्या वृक्षांवर कु-हाड चालवली. व व्यवसायासाठी जागा बळकावल्या. या भागातील लावण्यात आलेली झाडे झाडे तोडून काही नागरीकांनी बेकायदेशीर पणे अतिक्रमणे चालू केली असून परिसरात तीव्र संतापाची भावना आहे. ही सर्व अतिक्रमणे काढण्यात यावी अशी मागणी होत आहे. याबाबत सनी ढावरे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या दुर्लक्षपणावर टीका केली आहे व अतिक्रमण करणारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.