प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनाला पंढरपुरात यश; 8 दिवसांत नियमावली करणार जाहीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे!

Spread the love

पंढरपूर | आज पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासह राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 8 दिवसांत नियमावली जाहीर करतो असा आदेश काढल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

‘मला मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठ दिवसात नियमावली जाहीर करुन राज्यातील मंदिरे, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरू केली जाणार आहे, अशी माहिती आंबेडकरांनी दिली. यावेळी आंबेडकर म्हणाले की, ‘मला आणि 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आले. मंदिरं खुली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. लोकांच्या भावनेचा आदर केल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. आपण आठ ते दहा दिवस थांबू, दहा दिवसात आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार,’ असेही आंबेडकर म्हणाले. यावेळी आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांना संयम राखवा, असं आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.