गोपीचंद अवघड आहे समद..? अशा एका केलेल्या कॉमेंट मुळे पडळकर झाले ट्रोल;वाचा सविस्तर!

Spread the love

पुणे | समाजसुधार गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना करणाऱ्या पोस्टमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो वापरला. नेटकऱ्यांना संधी मिळाली आणि पडळकर सोशल मिडियावर ट्रोल झाले.

आज महाराष्ट्रा मधील समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंतीनिमित्त आताच नवीन झालेले विधानपरिषद सदस्य आ गोपीचंद पडळकर यांनी चक्क लोकमान्य टिळकांचा फोटो लावून गोपाळ गणेश आगरकरांची जयंती साजरी केली,यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच गाजू लागले. ट्रोल झाल्यानंतर त्यांनी आपले ट्विट डिलिट करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे.

आदर्की बुद्रुक चे ग्रामपंचायत सदस्य सागर जाधवर यांनी पडळकरांवर चांगलाच निशाणा साधला ते असे बोले की पडळकर समधच अवघड आहे…! जयंती आगरकरांची आणि फोटो टिळकांचा . अनेक नेटकऱ्यांनीही पडळकरांना ट्रोल केले. त्यामुळे आपले पहिली पोस्ट डिलीट करुन पडळकरांनी आगरकरांना अभिवादन करणारे दोन नव्या पोस्ट केल्या केले.

मागच्या काळात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल कालच्या पातळीवर टीका केली होती . त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. भाजपच्या राज्य नेतृत्वालाही याची दखल ग्यावी लागली होती.पण या उद्योग मुळे पडळकर यांचावर चांगलीच दमछाक झाली आहे

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.