भाजप आणि शिवसेनेच्या यूतीबद्दल शरद पवारांनी केला मोठा खुलासा?

Spread the love

मुंबई | शिवसेना ही भाजप बरोबर कधीही जाऊ नये अशी माझी इच्छा होती. कारण भाजपच्या हातात सत्ता गेली तर ती शिवसेनेच्या हिताची नाही, अशी माझी भूमिका होती. त्यामुळे मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी जाणून बुजून प्रयत्न केले. आणि त्याला यश आले असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या बहुचर्चित मुलाखती मध्ये केला आहे.

२०१४ मध्ये शरद पवार यांना भाजप बरोबर सत्ता बनवायची होती, असा आरोप देवेन्द्र फडवणीस यांनी केला आहे हे खर आहे का, असे राऊत यांनी पवार यांना विचारले असता. हे अजिबात खरे नाही आम्ही मुळात भाजपला बाहेरून पाठिंबा हा सेना आणि भाजपमध्ये दरी पडेल व शिवसेना भाजपबरोबर जाणार नाही यासाठी चातुर्याने ह्या गोष्टी केल्या होत्या. पण त्यावेळी आम्हाला यश आले नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने त्यावेळी सत्ता बनवली पण मी सातत्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर पडेल, यासाठी जाणून-बुजून प्रयत्न केले. कारण शिवसेना-भाजप बरोबर सत्तेत राहणे म्हणजे हे शिवसेनेच्या हिताचं नाही हे मी जाणून होतो. दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्याची सत्ता त्यांच्या हातात. यामुळे सेना किंवा इतर पक्षांना लोकशाहित या पक्षांना काम करण्याचा अधिकार आहे, हे ते मान्य करणार नाहीत म्हणून आम्ही राजकीय चाल खेळलो आणि त्याला यश आलं.

त्याचबरोबर २०१९ मध्ये भाजपचे अनेक लोक सत्ता बनवण्यासाठी आम्हाला शिवसेना नको आहे. पण सरकार स्थिर बनवण्यासाठी तुमचा आम्हाला पाठिंबा पाहिजे.  या चर्चेसाठी एकदा नवे तीन वेळा याबद्दल चर्चा झाली. माझे आणि प्रधानमंत्री यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अनेकांना वाटत होतं की यामध्ये नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून राष्ट्रवादी व भाजपने सत्ता बनवावी असं त्यांच्या लोकांना वाटत होतं. त्यानुसार मला निरोप आला. पण प्रधानमंत्री यांच्या कानावर चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वतः त्यांना पार्लमेंटच्या चेंबरमध्ये भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं. आम्ही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. एक वेळेस आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो किंवा विरोधात बसू शकतो पण तुमच्या बरोबर नाही. हे मी संजय राऊत यांनाच सांगून गेलो होतो. अशी आठवण पवार यांनी सांगितली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.