एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, बॉम्बे रुग्णालयातून डिस्चार्ज

Spread the love

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. पण त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे मुंबईमध्ये येत उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले होते. तिथे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांचे मुंबईत आल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, ‘मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये’, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं होतं.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी अशी चर्चा होती. पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सध्या घरीच विश्राम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.