तुम्हाला पासपोर्ट काढायचा आहे? घर बसल्या मोबाईलवरुन ऑनलाईन पासपोर्ट अप्लॅय करणे झालं सोपं!

Spread the love

मुंबई | तुम्हाला पासपोर्ट काढायचा आहे? आणि कोरोना काळात तुम्हाला घराबाहेर देखील पडता येत नाही आहे. तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता तुम्हाला पासपोर्ट मिळवण्यासाठी यापुढे पासपोर्ट ऑफिसचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. तुम्हा आता घरी बसून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी एमपासपोर्ट सेवा अ‍ॅप आणि वेबसाइटचा वापर केला जाऊ शकतो. नोंदणीनंतर तुम्हाला कागदपत्राच्या पडताळणीसाठी एक तारीख दिली जाईल. त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र किंवा प्रादेशिक पासपोर्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल.

आम्ही तुम्हाला पासपोर्टसाठी नोंदणी कशी करावी? हे सांगणार आहोत. लक्षात ठेवा की, पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे तुमचे ओरिजनल कागदपत्रं जसे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र इत्यादी असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक तारीख दिली जाईल त्या तारखेला पासपोर्ट सेवा केंद्र किंवा प्रादेशिक कार्यालयात तुमची सर्व मूळ कागदपत्रे दाखवावी लागतील.

या प्रमाणे अर्ज करा.

  1. सर्वप्रथम पासपोर्ट सेवा पोर्टल किंवा अ‍ॅप वर जा आणि Register Now वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि सेवा केंद्राचा तपशील भरावा लागेल.
  2. यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल अ‍ॅड्रेस इत्यादी भरावे लागेल त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  3. रजिस्ट्रेशन करताना तुमच्या समोर दोन पर्याय समोर येतील.  एक म्हणजे फ्रेश पासपोर्ट आणि दुसरे री-इश्यू पासपोर्ट पर्याय दिसेल.
  4. जर तुम्हाला नवीन पासपोर्ट घ्यायचा असेल, तर तुम्हाला फ्रेश पासपोर्टचा पर्याय निवडावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्टचे नूतनीकरण करायचे असल्यास री-इश्यू पासपोर्टच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  5. आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  6. यानंतर पेमेंट करा आणि तुमची अपॉइंन्टमेंट शेड्यूल करा. म्हणजेच  तुम्हाला ज्या दिवशी पासपोर्ट ऑफिसमध्ये कागदपत्रं वेरिफाय करायचे आहे तो दिवस निवडा. त्यानंतर अर्ज पावतीचे एक प्रिंट आउट घ्या.
  7. त्यानंतर नियुक्तीच्या तारखेला, आपल्याला जवळील पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देऊन किंवा प्रादेशिक कार्यालयात भेट देऊन सर्व आवश्यक कागदपत्रे दाखवावी लागतील.
  8. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेरिफिकेशन केले जाईल, जे आपल्या स्थानिक पोलिस स्टेशनवरून केले जाईल. त्यानंतर तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी वितरित केला जाईल.
Google Ad

20 thoughts on “तुम्हाला पासपोर्ट काढायचा आहे? घर बसल्या मोबाईलवरुन ऑनलाईन पासपोर्ट अप्लॅय करणे झालं सोपं!

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.