GOOD NEWS; पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, FREEमध्ये घ्या आधार केंद्राची फ्रेंचायझी आणि सुरू करा व्यवसाय!

Spread the love

नवी दिल्ली |  एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर एक घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करून देणारा आणि अत्यंत कमी भांडवलाची गरज असणारा एक व्यवसाय करता येईल. हा व्यवसाय आहे आधार कार्ड फ्रँचायझीचा. तुम्ही ही फ्रँचायझी अगदी विनामूल्य घेऊ शकता. फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना घ्यावा लागेल. आणि त्यासाठी एक परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. जाणून घेऊ या ही संपूर्ण प्रक्रिया.

यूआयडीएआय प्रमाणपत्रासाठी यूआयडीएआयतर्फे ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल. नंतर, तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता. मान्यता प्राप्त केंद्रामध्ये देखील तुम्ही त्याचं रुपांतर करू शकता. त्याकरता कॉमन सर्व्हिस सेंटरची (सीएससी) नोंदणी करावी लागेल.

आधार कार्ड केंद्राची कार्ये:-

– नवीन आधार कार्ड तयार करणे.

– आधार कार्डवरील नावात स्पेलिंग चुकले असेल तर ते दुरुस्त करणे.

– आधार कार्डवरील पत्ता चुकला असेल किंवा पत्ता बदलला असेल तर तो दुरुस्त करणे.

– आधार कार्डमध्ये जन्म तारीख चुकली असेल तर ती दुरुस्त करणे.

– फोटो स्पष्ट नसेल तर तो बदलणे.

– आधार कार्डमध्ये नवीन मोबाइल नंबर अपडेट करणे.

– ईमेल आयडी अपडेट करणे.

आधार कार्ड सेंटर उघडण्यासाठी आधी तुम्हाला ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना हा परवाना मिळतो.

♦परवान्यासाठी अर्ज करण्याची अशी आहे प्रक्रिया.

 1. – सर्व प्रथम एनएसईआयटीच्या (NSEIT) वेबसाइटवर जा (https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action).
 2. – इथं तुम्हाला Create New User वर क्लिक करा.
 3. – आता एक XML फाईल उघडेल.
 4. – तिथं Share Code enter टाकण्यास सांगितले जाईल.
 5. – एक्सएमएल फाइल आणि शेअर कोडसाठी आपण आधारच्या वेबसाइट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपले ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करू शकता.
 6. – यावेळी XML फाईल आणि Share Code दोन्ही डाउनलोड केले जातील. वर उल्लेख केलेल्या ठिकाणी त्यांचा वापर करावा.
 7. – आता आणखी एक फॉर्म येईल ज्यामध्ये आपल्याला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
 8. – हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि E-mail आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड येईल.
 9. – याद्वारे आपण Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉग इन करू शकाल.
 10. – त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा.
 11.  आता एक फॉर्म समोर येईल, त्यामध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या भरा.
 12. – हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपला फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
 13. – आता तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शन दिसेल. यामध्ये आपण फॉर्ममध्ये दिलेली माहिती बरोबर आहे की नाही हे याची खात्री करून घ्या.
 14. – आता Declaration Box क्लिक करुन Proceed to submit form करण्यासाठी क्लिक करा.

आता पेमेंट करावे लागेल.

ही सर्व प्रक्रिया केल्यावर आपल्याला पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर साइटच्या मेनूवर जा आणि पेमेंटवर क्लिक करा. आता आपले बँक खाते निवडा. त्यानंतर Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. तिथून तुम्हाला चलन पावती डाउनलोड करून ती प्रिंट करावी लागेल.

केंद्र बुक करावे लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर 24 ते 36 तासानंतर वेबसाइटवर परत लॉग इन करा आणि Book Center वर क्लिक करा. इथं आपल्या जवळचे कोणतेही केंद्र निवडा. तुम्हाला या केंद्रावर आधार परीक्षा द्यावी लागेल. तारीख आणि वेळ निवडा आणि फॉर्म सबमिट करा. यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रवेशपत्र मिळेल. हे प्रवेश पत्र डाउनलोड करून प्रिंट करा.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.