मोदी सरकारची सरशी; विरोधकांच्या गदारोळात शेती विधेयक राज्यसभेतही मंजूर!

Spread the love

नवी दिल्ली | अखेर राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले आहेत. एकीकडे विरोधकांनी जोरदार विरोध केला तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सरकारने विधेयक मंजूर करणारच यावर ठाम होते. अखेर राज्यसभेत मोठ्या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयकांवर मतदान घेऊन मंजुरी मिळवली आहे.

आज राज्यसभेत सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून एकच वाद पेटला होता. कृषी मंत्र्यांनी उद्या उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली. पण या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर देत आहे चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी राज्यसभेच्या उपसभापतींसमोरील माईकच तोडून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पण, अखेर या गोंधळातच दोन्ही विधेयक मंजूर झाले आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.