मराठा आरक्षण; महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली घेतली खा. संभाजीराजे यांची भेट

Spread the love

नवी दिल्ली | मराठा आरक्षण  मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खा.सुजय विखे पाटील यांच्यासह खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार हीनाताई गावित, खासदार प्रितमताई मुंडे, खासदार भारतीताई पवार खासदार संभाजीराजे  यांची भेट घेतली.

या भेटीवेळी मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, त्यातील न्यायालयीन बाबी, सर्व घडामोडी व याविषयातील सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी समजमध्यामावर स्पष्ट केले.यावेळी या सर्वांनी मराठा आरक्षणातील लढ्यासाठी आम्ही खंबीरपणे आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही खासदार खा. संभाजीराजे यांनी दिली.तसेच चर्चेदरम्यान खासदार संभाजीराजे महाराजांना आपण स्वतः पुढाकार घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी अवगत करावे. तसेच याबाबतीत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, अशी विनंती खासदार संभाजीराजे यांना केली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.