रब्बी पिकांसाठी ‘किमान हमी दर’ वाढवण्याला मोदी सरकारची मंजुरी!

Spread the love

नवी दिल्ली | केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर करुन घेतले. आता मोदी सरकारने रब्बी पिकांसाठी ‘किमान हमी दर’ (एमएसपी) वाढवण्याला मान्यता दिली आहे. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर याबाबत सभागृहात माहिती देतील. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकावरुन विरोधी पक्ष केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असा विरोधकांकडून प्रचार केला आहे. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान हमी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे ‘एमएसपी’ रद्द होईल असा प्रचार विरोधक करत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान हमी दर बंद होणार नाही, असे आश्वासन सभागृहात दिले होते. आता एमएसपी किंमत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

कृषी मंत्रालय सामान्यतः रब्बी पिकांच्या पेरणी हंगामात एमएसपीची घोषणा करत असते. मात्र यावेळी, ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात होणारी ही घोषणा सरकार सप्टेंबर महिन्यातच करणार आहे. हा विरोधकांचे हल्ले परतवण्याचा प्रयत्न असू शकतो. गत वर्षी सरकारने २३ ऑक्‍टोबरला रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली होती. यावेळी लागवडीपूर्वीच एमएसपी घोषित होत असल्याने, कोणत्या पिकाची पेरणी करायला हवी, हेदेखील शेतकऱ्यांना ठरवता येईल. जाहीर होणाऱ्या नव्या एमएसपीवर पुढील वर्षी १ एप्रिलपासून रब्बी पिकांच्या खरेदीला सुरुवात होईल.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.