Spread the love

बारामती | 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ह्या संकल्पनेने भाजपने पहिल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये ताकद आजमावण्यास सुरुवात केल्याचे आपण पाहिले आहे, आणि भारतात सर्वात संवेदनशील अशा जागेवर म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले असतानाच खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची नवीन संकल्पना शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्ष निर्माण करून रुग्णांना मदत आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी हा एक आखलेला डाव सुप्रियाताई सुळे यांना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये दिल्लीला पोहोचवण्यासाठी किती ताकदवान असू शकतो हे येणारा काळ सांगून जाईल.

आचारसंहितेच्या अवघ्या दोन दिवस आधी शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामतीतून सुरुवात केल्याचे आपण पाहिले तसेच कक्ष प्रमुख म्हणून काही काळी शिवसेनेकडे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भूषण सुर्वे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली, आणि ही जबाबदारी सार्थ ठरवत भूषण सुर्वे यांनी सुप्रियाताईंच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून 22 लाखांपेक्षा जास्त निधी रुग्णांना मिळवून देणे मध्ये यशस्वी झाले व तसेच मोठमोठे हॉस्पिटल मधून बिलामधून सुप्रियाताईंच्या शिफारशी च्या माध्यमातून 24 लाखांपेक्षा जास्त बिलामधून सवलत देण्यामध्ये यशस्वी झाल्याचे दिसले, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचीजी चुरशीची असणारी निवडणुक यामध्ये शरदचंद्रजी पवार वैद्यकीय मदत कक्षाची ताकद ताईंना दिल्लीपर्यंत पोहोचवणार का हे आता येणाऱ्या 4 जूनला पहावे लागेल.

संपादकीय लेख

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.