मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरे शिलेदार मंगेश चिवटे सर्वसामान्य मराठा-शेतकरी बांधवांच्या पाठीशी; मराठा समाजाकडून चिवटेंचे कौतुक

Spread the love

*अंतरवली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले पुन्हा एकदा धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;*

*सभास्थानामुळे नुकसान झालेल्या ४४१ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३२ लाखांची; तर १३० शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात १४ लक्ष रुपयांची भरपाई*

*_जालन्यातील शेतकऱ्यांना ”लोकनाथा”चा प्रत्यय; जखमींवरील उपचारासाठी २५ लाखांहून अधिकचे अर्थसहाय्य_*

*मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या ८० समाजबांधवांच्या कुटुंबास प्रत्येकी १० लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य वितरित; तर शैक्षणिक अहरतेनुसार नोकरीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू*

जालना | अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेवेळी लाखोंची गर्दी जमली होती. यावेळी अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. यापूर्वी पहिल्या टप्प्यात यातील ४४१ बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तर, आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राहिलेल्या १३० शेतकरी बांधवाना १४ लक्ष ५५ हजार रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक स्थितीत पोहोचले आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्विकारला आहे. सरकारकडून येत्या २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केल्याने मराठा समाजाकडून समाधान व्यक्त केले जात असतानाच जालन्यातील विशेषतः अंतरवली सराटी आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

कारण एखाद्या आपत्तीत झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. एखाद्या सभेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रघात नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा उभारण्यात आलेला प्रामाणिक लढा आणि त्यात समाजबांधवांनी घेतलेला उत्स्फुर्त सहभाग लक्षात घेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेत जमीनीचे सभास्थान म्हणून वापरल्याने झालेल्या नुकसानासाठी संबंधित ४४१ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात तर १३० शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. एकूण ५७१ शेतकऱ्यांना ४६ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचे शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

याकामी मंगेश नरसिंह चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल सर्व शेतकरी बांधव यांनी त्यांचेही आभार मानले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचारासाठीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य केले होते.


तर, गेली ६ महिन्यात या आंदोलना दरम्यान बलिदान दिलेल्या ( आत्महत्या ) एकूण ८० मराठा समाज बांधवांच्या परिवारास प्रत्येकी १० लक्ष अशी एकूण ८ कोटी रुपये मदत वितरीत करण्यात आलेली आहे. तसेच, मृत कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्यास महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळात शैक्षणिक अहरतेनुसार नोकरी देण्याचा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
००००

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.