शरद पवारांनंतर तुमचं स्थान काय राहील, अजित पवारांनी त्याचा विचार करावा – चंद्रकांत पाटील!

Spread the love
  • कोल्हापुरला परत जाण्याच्या वक्तव्यानंतर झालेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांचे उत्तर पवारांवर साधला निशाणा.
  • केंद्रानं मला दिलेलं मिशन पूर्ण होईपर्यंत पुण्यातच राहणार.
  • अजित पवारांनी त्यांच्या स्थानाचा विचार करावा.

पुणे | मुळचे कोल्हापुरचे चंद्रकांत पाटील यांनी मागील विधानसभा निवडणूक पुण्यातून लढवली व आमदार झालेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी असलेले चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून निवडणूक लढवल्यानंतर विरोधक कायम त्यांना लक्ष्य करत असतात. त्यानंतर काल चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापुरला परत जाणार असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार  व सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा विरोधकांना लक्ष्य करत कोल्हापूरला परत जाणार या वाक्यानं हुरळून जाऊ नये किंवा घाबरु नका असे म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  व अजित पवार यांच्यावरही पाटील यांनी निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं: चंद्रकांत पाटील

अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, त्यांनी त्यांच्या स्थानाची काळजी करावी. शरद पवार महाराष्ट्रात कुणाला पद देण्याची वेळ आल्यावर कोणाला देतील, याचा विचार अजित पवारांनी करावा, अजित पवार किंवा सतेज पाटील काय म्हणतात याचा विचार करण्याची गरज नाही: चंद्रकांत पाटील.

कोथरुडची निवडणूक एवढंच माझं मिशन नाही: चंद्रकांत पाटील

कोथरुडची निवडणूक एवढंच माझं मिशन नाही. कोरोनामुळं काही मर्यादा होत्या. पुण्याचं दिलेलं मिशन पूर्ण होईपर्यंत पुण्यात राहणार. राज्याचा अध्यक्ष असल्यामुळं कुठेही राहू शकतो. गिरीश बापट यांच्या वक्तव्याच्या संदर्भात कोल्हापूरला परत जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

पुण्यातील मिशन पूर्ण झाल्यावर कोल्हापूरला परत जाणार: चंद्रकांत पाटील

कोल्हापूरला परत जाणार या वाक्यानं हुरळून जाऊ नये किंवा घाबरुन जाऊ नये. केंद्रानं मला दिलेलं मिशन पूर्ण होईपर्यंत पुण्यातच राहणार आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.