नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे तथा घरांची पडझड नुकसानभरपाईची बहुजन विकास मोर्चाच्या वतीने मागणी - MahaMetroNews Best News Website in Pune

नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे तथा घरांची पडझड नुकसानभरपाईची बहुजन विकास मोर्चाच्या वतीने मागणी

 

परवेज मुल्ला
उस्मनाबाद प्रतिनिधी :
कळंब तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतातील काढलेल्या सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .तरी सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत द्यावी तसेच सनसामान्यांची या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले असुन काही घरांची पडझड झाली आहे तरी शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंबंधीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कळंब यांना देण्यात आले आहे. यावर जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल सिद्धार्थ वाघमारे प्रेम भांडे स्वप्नील चिलवंत आतिश वाघमारे प्रतिक गोरे धनराज नाईकवाडे चैतन्य वाघमारे कुमार वाघमारे अविनाश जाधव(वाशी) आतिश ओव्हाळ(भुम) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.