लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.ज्ञानराज चौगुले यांची पाहणी

Spread the love

 

परवेज मुल्ला
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील लोहारा शहर, माकणी, राजेगाव व मर्शदपूर(नागराळ) या गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची व निम्न तेरणा प्रकल्पास खासदार ओमराजे निंबाळकर व आ.ज्ञानराज चौगुले यांनी भेट देऊन सद्यस्थितीबाबत माहिती घेतली.

लोहरा शहरातील अतिवृष्टीमुळे अचानक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबाना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केल्या कुटुंबाची भेट घेऊन संवाद साधून धीर दिला. तसेच या कुटुंबाना शिवभोजन स्थाळी मार्फत जेवणाची व्यवस्था, आरोग्य तपासणी करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

राजेगाव येथील राहुल दिलीप देशमुख व अतुल दिलीप देशमुख हे दोन शेतकरी व त्यांच्या २ म्हशीं पुराच्या पाण्यात अडकले होते यांना वाचवण्यात लातूर मनपाचे अग्निशमन दलाचे पथक व गावातील महेश सुरवसे यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. जवानांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले. यावेळी गावातील मनेश सुरवसे व उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमाले यांचा हि सत्कार करून अभिनंदन केले.

मुर्शदपूर (नागराळ) येथिल पाझर तलाव फुटल्यामुळे जवळपास १०० हेक्टर जमिनीचे, गावातील रस्त्यांचे तसेच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणी दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांला धीर दिला. तसेच प्रशासनाला ताबडतोब पंचनामे करण्याचे व जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जाचक अटी न लावता मदत करण्याचे निर्देश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

यावेळी ज्ञानेश्वर(माऊली) सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, जि.प.सदस्य दिपक जवळगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, पंडित ढोणे, सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच दादासाहेब मुळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमाले, नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, तालुका कृषि अधिकारी बिडबाग, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक, शेतकरी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.