आपण वापरत असेलल्या सॅनिटायझरमध्ये या गोष्टी आहेत का; जाणून घ्या!

Spread the love

मुंबई | मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य बदललेले आहे. या काळात आपला एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी तुम्ही ‘कोरोना’ हा शब्द ऐकला नसेल. रोजचे वाढणारे कोरोनाचे रुग्ण यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतलीच पाहिजे. आपण कामाशिवाय बाहेर पडू नका, बाहेर जाताना मास्कचा नियमित वापर करा आणि हॅंड सॅनिटायझरने हात धुवा, अशा बऱ्याच सूचना प्रत्येक ठिकाणी ऐकत आणि पाहत आला आहात. या काळात हॅंड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच याकाळात कोणत्या हॅंड सॅनिटायझरचा वापर नेमका कसा करायचा ते बऱ्याच जणांना माहीत नाहीये. बरेच जण याचा चुकीच्या पध्दतीने वापर करतात. आज आपण या लेखात कोणता हॅंड सॅनिटायझरचा वापरायचा आणि तो नेमका कसा वापर करायचा ते जाणून घेणार आहोत.

सध्या सॅनिटायझरचा वापर आणि त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बरेच नकली हॅंड सॅनिटायझर बाजारात मिळत आहेत. अशा सॅनिटायझरच्या वापरामुळे आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम दिसून येतात. याबद्दल US Food and Drug Administration (FDA)ने मिथेनॉल (methanol) आणि वूड अल्कोहोल (wood alcohol)हे घटक ज्या सॅनिटायझरमध्ये आहे त्यांचा वापर टाळावा असं सांगितलं आहे. हे घटक असणारे सॅनिटायझर आपल्या त्वचेवर दुष्परिणाम करतात, तसेच याचा आपल्या डोळ्याशी संबंध आला तर, यामुळे आपल्याला अंधत्व येऊ शकते. यामुळे असे सॅनिटायझर वापरू नये असं FDA ने सांगितले आहे. भारत सरकारनेही याबद्दल कडक नियमावली करुन बाजारातील नकली सॅनिटायझरवर चाप बसवला आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.