“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिका फेम म्हणजेच अश्विनी महांगडे यांचा नवीन लुक सर्वांना करतोय आश्चर्यचकित!

Spread the love

सातारा | स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बहीण म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्याच रानुअक्क; म्हणजेच अश्विनीताई महांगडे यांनी रणरागिनी या लुकमध्ये फोटोशूट केले आहे.

हे सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत अश्विनीचा या लुकसाठीचा मेकअप सज्जना दुटाळ आणि वेशभूषा तनुजा डिझायनर यांनी केला आहे त्याचबरोबर ऋषिकेश देशमुख यांनी हे झकास फोटो आपल्या कॅमेरामध्ये कैद केले आहेत

झी मराठी वाहिनीवरील पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली मालिका म्हणजेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये अश्विनीताई महांगडे या भूमिकेत दिसल्या होत्या, भरजरी साडी वजनदार दागिने भाषेतला शुद्ध पणा या सगळ्यांमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बहीण म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते.

त्याचसोबत अश्विनी महागडे या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात आणि फोटो व्हिडिओ चाहत्यांनसाठी नेहमी शेअर करत असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अभिनया शिवाय अश्विनी महागडे यांचे सामाजिक क्षेत्रातील मोठे योगदान आपणास पहावयास मिळत आहे ते म्हणजे

पूर्ण महाराष्ट्र मध्ये रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठान मार्फत संपूर्ण रणरागिणी आणि मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जगाला दिलेला संदेश त्या संदेशाला धरून समाजामध्ये सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे या सर्व सामाजिक कार्याला आणि पुढील कार्याला अश्विनीताई महांगडे यांना महा मेट्रो न्यूज पोर्टल यांच्याकडून सलाम.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.