अखेर इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर; असे असेल आरक्षण!

Spread the love

इंदापूर | सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज दि .८ डिसेंबर रोजी इंदापुर तालुक्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली. सोडतीनुसार सर्वसाधारण नागरिकांचा प्रवर्गासाठी (३०), सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी (३२), नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी(१५),महिलांचा इतर मागास प्रवर्गासाठी(१६), अनुसूचित जाती नागरिकांचा साधारण प्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलासाठी प्रत्येकी (१०) सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत.
तालुक्यातील भिगवण जवळील डिकसळ गावाच्या एकमेव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गाचे सरपंचपद राखीव असणार आहे.

आरक्षणनिहाय ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे :
● सर्वसाधारण नागरिकांचा प्रवर्ग -शेटफळगढे,पिंपळे, भिगवण,कुंभारगाव, अकोले, भादलवाडी, डाळज नं.३, पळसदेव,लोणीदेवकर,सणसर,जाचकवस्ती, कुरवली, तावशी, हगारेवाडी,घोरपडवाडी,वालचंदनगर,निमसाखर,कचरवाडी,गोतोंडी,वरकुटे खुर्द, जाधववाडी,अगोती नं.१,पिंपरी खुर्द,शहा,तरंगवाडी, झगडेवाडी, वडापुरी,शेटफळ हवेली,सुरवड, टण्णू.
● सर्वसाधारण महिला प्रवर्ग- डाळज नं.३, डाळज नं.२, बळपुडी,काझड,निंबोडी,पवारवाडी,बेलवाडी,थोरातवाडी,चिखली,न्हावी,शेळगाव,सराफवाडी,शिरसटवाडी,निरवांगी,दगडवाडी,कौठळी,गंगावळण, कळाशी, कालठण नं१,अजोती,माळवाडी,बिजवडी,कांदलगाव,पंधारवाडी,बाभुळगाव,बावडा,भोडणी,निरनिमगाव,लुमेवाडी,गोंदी ओझरे,पिंपरी बुद्रुक, गिरवी.
● नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग – तक्रारवाडी, म्हसोबाची वाडी,भावडी,आनंदनगर,लासुर्णे, मानकरवाडी,व्याहाळी,निमगाव केतकी,खोरोची,पडस्थळ,सरडेवाडी,गोखळी,भांडगाव,चाकाटी,पिठेवाडी.
● महिलांचा इतर मागास प्रवर्ग – मदनवाडी,शिंदेवाडी,बोरी, कळस,रुई,भरणेवाडी,रेडा,रेडणी,बोराटवाडी,अगोती नं.२, गलांडवाडी नं.२,अवसरी, वकीलवस्ती,लाखेवाडी,कचरवाडी,सराटी.
● अनुसूचित जाती नागरिकांचा साधारण प्रवर्ग – पोंदवडी,वरकुटे बुद्रुक,लाकडी,जांब,अंथुर्णे, कडबनवाडी,रणमोडेवाडीचांडगाव,कालठण नं.२,भाटनिमगाव.
● अनुसूचित जाती प्रवर्ग महिला – निरगुडे, जंक्शन,सपकळवाडी, उद्धट,पिटकेश्वर,कळंब,गलांडवाडी नं.१,तरटगाव,हिंगणगाव, नरसिंहपूर.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.