तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करावा; आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे गडकरींना निवेदन!

Spread the love

मावळ | तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करावा अशा मागणीचे निवेदन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना दिल्ली येथे भेट देऊन देण्यात आले.

मावळ, खेड, शिरुर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रास जोडणारा प्रमुख महामार्ग असलेला तळेगाव चाकण शिक्रापूर (रा.म.मा.५४८ डी) सुमारे ५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढते आहे. यामुळे या रस्त्याचा सर्वेक्षण अहवाल तयार करून त्याचा ‘भारतमाला प्रकल्पात’ समावेश करून या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी असे निवेदन दिले.

यावेळी आदरणीय गडकरी साहेबांनी तात्काळ मुख्य महाव्यवस्थापक तांत्रिक प्रादेशिक अधिकारी मुंबई मा.राजेश सिंग यांना फोन करुन तळेगाव-चाकण-शिक्रापुर महामार्गाची पाहणी करून सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आदरणीय गडकरी साहेबांनी अर्धा तास वेळ देऊन विविध विषयांवर चर्चा केली. स्व. केशवराव वाडेकर साहेब यांच्या कुटुंबियांबद्दल आत्मियतेने विचारपुस केली. विकासकामांचे रोल मॉडेल उभारणारे, विकासाची दूरदृष्टी असलेले आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी मला वेळ देऊन विस्तृत चर्चा केली असेही सुनील आण्णा शेळके यांनी यावेळी प्रसारमाध्यमाना सांगितलं.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.