विद्यार्थ्यांनसाठी Good News: डिप्लोमाच्या ऍडमिशनला सोमवार 10 ऑगस्ट पासून सुरुवात!

Spread the love

पुणे | इयत्ता १०वी नंतरच्या तंत्रनिकेतन पदविकेसह इयत्ता 12वीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पदविका प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने आज जाहीर केले आहे. १० ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तंत्रनिकेतन प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश १० ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. तंत्रशिक्षण विभागाने तंत्रनिकेतन प्रवेशाबरोबरच इतर अभ्यासक्रमाचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. १० ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रवेश अर्ज भरताना येणार आहेत.

पदविका व तंत्रनिकेतनसाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे ३१ मार्च २०२१ पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रमाणपत्र सादर करू न शकणारे विद्यार्थ्यांना राखीव जागांवर दावा करता येणार नाही, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशासाठी अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईद्वारे कागदपत्राची पडताळणी करता येईल. ज्यांना कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्राची पडताळणी करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी त्यांना तारीख व वेळ ठरवून दिले जाईल.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.