दुकान कामगार, भाजीविक्रेते यांचीही कोरोना चाचणी करा; केंद्राचे राज्यांच्या आरोग्य खात्यांना आदेश जारी!

Spread the love

पुणे | किराणा मालाच्या दुकानातील कामगार, भाजी, फळ विकणारे यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्या आरोग्य खात्यांना आदेश दिले आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्य प्रमाण एक टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे. भाजी विकणारे किंवा दुकान कामगार जे कोरोनाग्रस्त असतील त्यांच्यामुळे या संसगार्चा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असे सरकारने म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा असायलाच हवी. एखाद्या रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी संपर्क साधल्यानंतर किती वेळात त्यांच्याकडे रुग्णवाहिका पोहोचते किंवा रुग्णवाहिका येण्यास नकार मिळतो यावर राज्यांनी दररोज बारीक लक्ष ठेवले पाहिजे. नकाराचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
वयोवृद्धांची काळजी घ्या : आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे , घरोघरी जाऊन चाचणी करण्याचेही अनेक फायदे आहेत. घरातील वयोवृद्ध, गरोदर महिला यांच्या प्रकृतीला कोरोनामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना जपणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.