१५ ऑगस्टच्या निमित्ताने शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून तुळजापूर, उस्मानाबाद, पुणे, बीड या शहरातील रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद!
महाराष्ट्र | गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये रक्तदान या क्षेत्रामध्ये श्री शिवशंभू ट्रस्ट चे नाव मोठ्या प्रमाणावरती घेतले जाते, याचे कारणही तसे खासच आहे. इंदापूर तालुक्यातून या ट्रस्ट ला सुरुवात झाली, त्यावेळेपासून रक्तदाता आणि ब्लड बँक यांच्यामध्ये जो समाज गैरसमज होता हा दूर करून आपण जर रक्तदान केले असेल तर त्या व्यक्तीस रक्ताची मोफत बॅग देण्याचे काम हे ट्रस्टने केले आहे. यामुळे लोकांचा ट्रस्टवरील विश्वास हा कायमच वाढत चालला आहे.
आजपर्यंत महाराष्ट्रात ५००च्या वरती रक्तदान शिबिरे घेऊन अंदाजे ८०० च्या वरती गरजू रुग्णांना मोफत बॅग देऊन हे ट्रस्टने व ट्रस्टच्या तळागाळातील पदाधिकाऱ्याने हे शक्य करून दाखवले आहे. व जवळपास ३५,००० लोकांनी आणि रक्तदात्यांची तेवढाच विश्वास रक्तदानही केले आहे.
- बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात ७० लोकांनी,
- उस्मानाबादमधील कळंब या शहरात १०५ लोकांनी,
- पुण्यामध्ये मंगळवार पेठेतील भीमनगर मंडळातील ५५ लोकांनी,
- तुळजापूर शहरात २ ठिकाणी भवानी प्रतिनिष्ठान व रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान यांनी शिवशंभू ट्रस्टच्या साथीने अनुक्रमे ५५ आणि ७१ लोकांनी रक्तदान केले.
यावेळी माजलगावात प्रभू श्रीरामचंद्र सेवाभावी संस्था, तुळजापुरात भवानी प्रतिनिष्ठान व रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, कळंब मध्ये जलमंदिर प्रतिष्ठान, सोमनाथभाऊ फौंडेशन, व पुण्यामध्ये मंगळवार पेठेतील भीमनगर मंडळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी या सर्वांचे आभार मानले व यापुढे शिवशंभू ट्रस्ट सोबत सामाजिक कार्यात हातभार लावावा असेही आव्हान करण्यात आले.