१५ ऑगस्टच्या मुहूर्तावर उमरग्यामध्ये श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे पहिले जनसंपर्ककार्यालय लोकांच्या सेवेत!

Spread the love

उमरगा | १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर उमरग्यामध्ये श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे पहिले जनसंपर्क कार्यालय उमरगा शहरात शिवसेना वैद्यकीय कक्ष व ट्रस्ट च्या माधमातून लोकांच्या सेवेत कालपासून चालू केले. गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये रक्तदान या क्षेत्रामध्ये श्री शिवशंभू ट्रस्टचे नाव मोठ्या प्रमाणावरती घेतले जाते, याचे कारणही तसे खासच आहे. इंदापूर तालुक्यातून या ट्रस्टच्या कार्याला सुरुवात झाली, त्यावेळेपासून रक्तदाता आणि ब्लड बँक यांच्यामध्ये जो समाज गैरसमज होता हा दूर करून आपण जर रक्तदान केले असेल तर त्या व्यक्तीस रक्ताची मोफत बॅग देण्याचे काम हे ट्रस्टने केले आहे. यामुळे लोकांचा ट्रस्टवरील विश्वास हा कायमच वाढत चालला आहे.

आजपर्यंत महाराष्ट्रात ५००च्या वरती रक्तदान शिबिरे घेऊन अंदाजे ८०० च्या वरती गरजू रुग्णांना मोफत बॅग देऊन हे ट्रस्टने व ट्रस्टच्या तळागाळातील पदाधिकाऱ्याने हे शक्य करून दाखवले आहे. व जवळपास ३५,००० लोकांनी आणि रक्तदात्यांची तेवढाच विश्वास रक्तदानही केले आहे. उमरगा शहरात पहिल्यांदा बऱ्याच अडचणींचा सामना तेथील कमिटीला करावा लागला परंतु जसे जसे लोकांना समजायला लागले तसे तसे ट्रस्ट च्या कामाचा आलेख कमी दिवसातच वाढत गेला.

कालच्या कार्यक्रमाच्या वेळी यावेळी माझी उपसभापती सुरेश आप्पा वालेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला सोबत यावेळी उपस्थित दाळिंब गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष जब्बार पटेल साहेब, डॉ मुल्ला साहेब, डॉ राय, किशोर जाधव, स्वप्निल वाले, प्रमोद सुरवसे, किशोर मुगळे, गौरीशंकर टिकांबरे, सतिश माने, अस्लम शेडमवाले, श्रीकांत सुतार, अंकुश टाकले, हिराजी पाटील, शिवा भोळे, शाम हिडोळे, खंडु मुळे, अजय वाले, रावण साम्राज्य ग्रुप, शुभम भोळे, सुनील वाले,अजय फडताळे, सचिन घोडके,विशाल मुगळे,राज भोळे, सादिक चाकुरे, संजय साहेब कुभांर, अभिजीत पाटील, कल्लेशवर टिकांबरे, कुंडलिक अर्जुनकर, मनोहर जगताप, सचिन पावणे, राजेंद्र खजुरे, व ईतर गावकरी व ग्रामपंचायत दाळिंब व शिवशंभू चरिटेबल ट्रस्ट पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यापुढे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून हॉस्पिटलची जी मदत लागेल (उदा. बिल कमी करणे ) हि सर्वतोपरी करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.

हॉस्पिटल व रक्त यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती तातडीने सोडविण्यासाठी या संपर्क कार्यालयाचा हेतू आहे असेही यावेळी शिवशंभू ट्रस्ट उमगर शहर कमिटीच्या वतीने जाहीर सांगण्यात आले. व या कार्यक्रमांसाठी शिवशंभू ट्रस्ट उमरगा शहराचे अध्यक्ष योगेशजी भोळे, शहर उपाध्यक्ष शांतेश्वर म्हेत्रे, शहर कार्याध्यक्ष विजयकुमार फडताळे, शहर संपर्कप्रमुख अमर शिरोळे, शहर संघटक सागर वाले, व संपर्क कार्यालय प्रमुख आप्पू राजे शेवरे या सर्वांच्या विशेष सहकार्यातून ह्या संपर्क कार्यालयाचा उगम झाला व या सर्वांचे मोलाचे योगदान हि लाभले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.