Spread the love

मुंबई | बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. अनेक विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. तर, अनेक विद्यार्थी पारंपारिक विद्याशाखांना प्रवेश घेण्याऐवजी नवीन वाटा शोधत असतात. समाजकार्य हा एक विद्यार्थ्यांपुढं चांगला पर्याय आहे. महाराष्ट्राला समाजकार्याचा आणि समाज सुधारणेचा चांगला वारसा आहे. समाजकार्य अभ्यासक्रम राबवणारी नामवंत महाविद्यालय महाराष्ट्रात आहेत. समाज कार्य अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेणं आवश्यक आहे.

प्रवेशाची प्रक्रिया..

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या तुलनेत समाजकार्य अभ्यासक्रमांची महाविद्यालय कमी संख्येनं असल्यानं बहुतांश महाविद्यालयात प्रवेश परीक्षा किंवा गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश दिले जातात.

BSW अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर करिअर संधी..

बॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW) अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सोशल वर्कर म्हणून काम करण्याची संधी मिळते. याशिवाय सोशल एज्युकेटर आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर पदावर संधी मिळते. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील मिळू शकतं. केंद्र सरकारचे प्रकल्प, राज्य सरकारचे प्रकल्प आणि गैर शासकिय संस्था, सामाजिक संस्थांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळते.

समाजकार्यातील पदवी अभ्यासक्रम: BSW..

बारावीनंतर बॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW) या अभ्यासक्रमाला बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. BSW हा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. BSW हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मास्टर ऑफ सोशल वर्क या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

महाराष्ट्रातील प्रमुख समाजकार्याचं शिक्षण देणाऱ्या संस्था..

मुंबई विद्यापीठ , मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, या विद्यापीठांशी सलंग्नित महाविद्यालयात अभ्यासक्रम चालवले जातात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई चे विविध कॅम्पस, सायबर, कोल्हापूर येथे समाजकार्य अभ्यासक्रम चालवले जातात.

 

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.