शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी; कोकणातील व मुळशीतील पूरग्रस्त गावाला पुरवली मदत!

पुणे | लाभला आम्हांस शिवशंभूंचा वारसा या ब्रीद वाक्याने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवराज छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने रक्तदानामध्ये महाराष्ट्रभर कायम मदत चालू असताना आज दि ऑगस्ट रोजी मुळशी तालुक्यातील माले या गावात ढगफुटी अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतुकोकणात बऱ्याच लोकांनी मदत केल्यामुळे हे गाव मदतीपासून वंचित होते हे समजताच ट्रस्ट च्या वतीने या गावास अत्यावश्यक साहित्याचीमदत करण्यात आली.

यामध्ये माळशिरस तालुका अकलूज, जय भवानी ग्रुप बागेचीवाडी, बारामती, इंदापूर, पुणे, औदुंबर ढोल ताशा पथक, कल्याण (मुंबई), सर्वविभागातील शिवशंभू ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचे तसेच अक्षय ब्लड बँक, हडपसर पंढरपूर ब्लड बँक यांचेही विशेष सहकार्य लाभले.

तत्पूर्वी काल रात्री कल्याण येथून औदुंबर ढोल ताशा पथकाचे सर्वेसर्वा शिवशंभू ट्रस्ट कल्याण शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधून चिपळूणच्या दिशेने 1ली  गाडी मार्गस्त करण्यात आली, त्यानंतर आज पुण्यातून शुक्रवार पेठ पोलीस लाईन स्वारगेट इथून 2री गाडीमार्गस्त करण्यात आली

यावेळी मदतीची गाडी मार्गस्त करताना शिवशंभू ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, खडक पोलीस स्टेशनचेपी. आय. मा गाडे साहेब, चव्हाण मॅडम महिला सेल काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश गायकवाड, शिवशंभू ट्रस्ट पुणे महिलाअध्यक्ष सोनालीताई जाधव, पुणे शहर संपर्क प्रमुख अमित कुचेकर, बारामती तालुका कार्याध्यक्ष माउली खाडे, पुणे शहर कार्याध्यक्ष राहुलजीभोसले, माळशिरस तालुका अध्यक्ष रणजितदादा गायकवाड, राष्ट्रवादी युवक पुणे शहर युवकचे अचूय्त लांडगे, सुशांत पाटील, सिद्धार्त चव्हाण, सौ वनिता जाधव शिवशंभू ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हि मदत शारदा दातीर विनोद दातीर (पोलीस पाटीलमाले) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी माले गावाच्या वतीने सरपंच पोलीसपाटील यांनी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या  कामाचे अभिनंदन केले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.