११ हून अधिक वेळा आमदारकी भोगलेले, राज्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी घेतला अखेरचा श्वास!

Spread the love

सोलापूर | महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय 96) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. सोलापूरमध्ये एका खासगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पित्ताशयाची शस्त्रक्रिया ही पडली पार पडली. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.

शेतकरी कामगार पक्षाकडून (PWP) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तब्बल 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. आबासाहेब या नावाने ते परिचित होते. त्यांचा जन्म 10 आॅगस्ट 1926 रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रात विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलेले नेते म्हणून त्यांचा लौकीक होता. गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. त्यांनी पहिल्यांदा 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांचा केवळ दोनदाच पराभव झाला. 1972 आणि 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते सलग आमदार राहिले. 1972 च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी ते त्यानंतर झालेल्या 1974 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना लागला तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1977 साली गणपत आबांनी महाराष्ट्र विधानसभेच ‘विरोधीपक्ष नेते’ पद सांभाळले होते. त्यानंतर 1978 मध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री झाले.

महामेट्रो न्यूज पोर्टल च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!!

💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

Google Ad

1 thought on “११ हून अधिक वेळा आमदारकी भोगलेले, राज्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी घेतला अखेरचा श्वास!

  1. I do agree with all the ideas you have presented on your post. They’re really convincing and can certainly work. Nonetheless, the posts are very short for beginners. May you please prolong them a bit from next time? Thank you for the post.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.