शिवशंभू ट्रस्ट कमिटी कल्याण शहर व औदुंबर ढोल ताशा पथकाच्या वतीने कोकणात 150 जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप!

Spread the love

कल्याण | अगदी कमी वेळात शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे काम मुंबई परिसरात लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम औदुंबर ढोल ताशा पथकाचे प्रमुख मा अनिकेत दादा ढवळे हे करत आहेत, गेली २ वर्षे कोरोनासारख्या महाभयंकर काळात अनेक प्रकारे लोकांना मदतीचा हात देण्यात आला. ढोल ताशा पथकाच्या मिरवुणुकीला वगैरे काही वायफळ खर्च न करता लोकांना कशी मदत करता येईल याकडे कायम लक्ष दिले जाते, त्यातच कोकणात आलेल्या पुरग्रस्तांनसाठी पथकातील वादकांनी आणि कल्याण पूर्व मधील राय हेरिटेज को.हौ.सोसायटी मधील राहिवाश्यांनी एकत्र येऊन त्यांच्या परीने जेवढी मदत जमा करता येईल तेवढे त्यांनी केले, म्हणूनच काल एकूण 150 परिवारात पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूचे किट तयार करून पोहच करण्यात आले.

https://youtube.com/shorts/HoAnfKT2e-4?feature=share

कोकणातील काकरतळे गावात १०० कीट कपडे चादरी, ताट, वाटी हे आम्ही या सदस्यांनी स्वतःहा जाऊन पाहणी करून कुटुंबांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. त्या गावातील रहिवासी सन्नी पवार आणि श्री शंभूराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सिध्देश मोरे दादा यांनी आमच्या सोबत येऊन तिथल्या प्रत्येक घरांमध्ये झालेली अवस्था दाखवली, असे अनिकेत ढवळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. खरंच अश्या वेळेस आपण माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचे आव्हान औदुंबर ढोल ताशा पथकाने बाकी प्रतिष्ठान आणि मंडळांना केले आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.