आरोग्यवारीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ऍम्ब्युलन्स एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुण्यात दाखल; पंढरपूरपर्यंत देणार वारकर्यांना मोफत सेवा!

ठाणे | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मंगेश चिवटे सरांच्या मार्गदर्शनाखालीवंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी पासून श्रीक्षेत्र आळंदीआणि श्रीक्षेत्र देहू येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघणाऱ्या अनुक्रमे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी यादोन्ही पालखी मार्गावर वारकरी बांधवांकरिता आरोग्य वारी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या आरोग्य वारीच्या माध्यमातून वारकरी बांधवांची दैनंदिन मोफत आरोग्य तपासणी, उपचार तसेच मोफत ओषधांचे वाटप करण्यात येणारआहे. आज ठाणे शहरातून मा. पालकमंत्री तथा नगरविकासमंतरी मा एकनाथ शिंदे साहेब,  खा. डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब आणि मंगेशजीचिवटे सर यांनी भगवा झेंडा दाखवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमला आरोग्य वारीसाठी शुभेच्छा दिल्या. गाड्यापालखी प्रस्थानाकडे रवाना करण्याची परवानगी दिली.

आपल्या सर्वांच्या सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पुणे शहर पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, सहाय्यक, डॉक्टर कार्यकर्ते २४/ पालखीच्या प्रत्येक विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी सेवेसाठी हजर राहतील आपणही सहकार्य करावे असे आव्हानमा. मंगेश चिवटे सरांच्या माध्यमातून करण्यात आले.

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा!

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.