Spread the love

पुणे | रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून राजकारण विरहित वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच मा. बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे सर व राजाभाऊ भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर या पालखीमार्गावर नियमित वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येत होती.

यामध्ये पुणे जिल्ह्याची जबाबदारी मा राजभाऊ भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण सुर्वे यांच्याकडे पुणे जिल्हा समन्वकाची जबाबदारी देण्यात आली होती त्याचप्रमाणे अजय सपकाळ आणि जितू होते यांच्याकडे पुणे शहर व नजीकच्या मुक्कामाची जबाबरी देण्यात आली होती. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संजयबाप्पू सपकाळ, सतीश गावडे, कल्पनाताई काटकर, सारिका आटोळे, भाग्यश्री जाधव, अरविंद दाभोलकर,  वसंत मामा साळुंखे, सागर आवटे, सोमनाथ लांडगे, रणजित गायकवाड मोहोळचे समन्वयक सुरज जम्मा डॉ अमोल खानावरे, डॉ उत्कर्षा चितळे, दिनेश घाडगे, विवेक शिंदे, सुरज पाटील, विशाल धुमाळ, राहुल ढवळे, सुरज पुजारी, सुरेश दोरी, शुभम सपकाळ, शिवाजी शिंदे, सागर बनसोडे, नवनाथ सुतार, सचिन चौधरी, सोमनाथ लांडगे, adv आनंद केकाण, डॉ विनोद राजपुरे, व ऍम्ब्युलन्सचे सारथी प्रविण भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भर पावसात रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत स्वतःहा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे शहर समन्वयक, प्रचार प्रसिद्धी संघटन समन्वयक महा राज्याचे मा राजभाऊ भिलारे, ठाणे जिल्हा समन्वयक गणपती कांबळे, सुरज जम्मा मोहोळ तालुका समन्वयक वैद्यकीय मदत कक्ष, बारामतीचे सतीश गावडे, डॉ जयवंत भिसे, डॉ ज्ञानेश्वर नागरगोजे, ऍम्ब्युलन्सचे सारथी प्रवीण भोसले व वैद्यकीय मदत कक्षाचे सोलापूर-पुणे-मुंबई-सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी सर्वजणांनी उपस्थित राहून पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून समाजकार्य करण्यास हातभार लावला.

तसेच शेवटच्या दिवशी रात्री पंढरपूरमध्ये पोहचताच डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सर्वेसर्वा वैद्यकीय कक्षाचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेबांनी व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे सरांनी स्वतःहा पंढरपूर शहरातील शिवाजी महाराज चौकातील ऍम्ब्युलन्सपाशी येऊन आरोग्यसवकांचे स्वागत केले.

यामध्ये प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमने आणि डॉक्टारांनी मिळून हे सेवा देण्यास मोलाचे सहकार्य केले या सेवेमध्ये 60 ते 70 पदाधिकारी कार्यकर्ते आरोग्यसेवकांनी सहभाग नोंदविला होता. अंदाजे लाखो वारकर्यांना प्राथमिक स्वरूपात औषधे आणि गोळ्या यांचे वाटप मोफत करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून हि आरोग्यवारी 2022 व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले यामुळे हे शक्य झाले अशी भावना वैद्यकाय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केली व सर्वच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याऱ्या पदाधीकारी व आरोग्यसेवकाचे आभार यावेळी मानले व पुढील वर्षी आणखी जोमाने काम करू असा विश्वास दिला.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.