राजेगाव येथिल निम्न तेरणा प्रकल्पा वरिल बॅरेजला मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील भेट
परवेज मुल्ला
उस्मानाबाद | लोहारा तालुक्यातील राजेगाव येथिल निम्न तेरणा प्रकल्पा वरिल बॅरेजलामृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील भेट देऊन सद्यस्थितीबाबत माहिती व अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावरच मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील साहेब यांनी आढावा घेतला.
शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांला धीर दिला. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण सरकार आपल्या सोबत आहे. तसेच एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिला नाही. व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली गेली पाहिजे यासाठी प्रशासनाने सरसकट पंचनामे करावे असे आदेश प्रशासनाला दिले.
यावेळी उस्मानाबाद चे खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, ज्ञानेश्वर तात्या(माऊली) सूर्यवंशी, किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, विनायक पाटील, आण्णासाहेब पाटील, जिल्हास्तरीय सर्व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.