तुळजापुरात तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सवातील गरूड वाहनावरचा छबीना उत्सव शांततेत!

Spread the love

 

परवेज मुल्ला
उस्मानाबाद | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सवाची ख-या अर्थाने शनिवारी घटस्थापनेने झालेली असून रात्री १० वाजता देविच्या प्रथापरंपरेनुसार छबीना उत्सव मंदिरचे व्यवस्थापक तथा तहसिलदार सौदागर तांदळे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम-परमेश्वर, नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,सहा.व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतोले,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

छबिना म्हणजे देविच्या मुर्तीची छबी (उत्सवमुर्ती)ची मिरवणूक होय.श्री तुळजा भवानी मातेची छबी म्हणजेच देविची उत्सवमुर्तीची
(प्रतिमुर्ती) व देविच्या पादुकांची मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पुर्ण करतात यालाच देविचा छबिना काढला असे म्हणतात.वर्षभरात हा धार्मिक उत्सव दर मंगळवारी,पोर्णिमा, पोर्णिमेच्या अगोदरचा व नंतरचा दिवशी साजरा होत असतो. अश्विन महिन्यातील कोजागिरी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशीचा छबिना हा दिपावलीच्या पाडव्या दिवशी तर फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेचा छबिना गुडीपाडवाच्या दिवशी काढण्यात येत असतो.देविला वर्षातून साधारण २१ दिवसाची निद्रा दिली जात असते या कालावधीत छबिना उत्सव काढला जात नसतो.

तसेच देविचे मुख्य भोपे पुजारी व भक्तगण हे देखील जोगवा मागत नसतात. छबिना उत्सव हा मंदिर बंद करण्यापुर्वी साधारण रात्री १० च्या दरम्यान करण्यात येत असतो.दैनंदिन सायंकाळची अभिषेक पुजा,धुपारती व नैवेद्य पाळीवाला मुख्य १६ आणे भोपे पुजारी
(सोवळ्यातील) यांच्याकडून हा धार्मीक विधी केल्यानंतर तो भोपे पुजारी व मंदिरचे व्यवस्थापक,तहसिलदार अथवा विश्वस्त यजमान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा छबिना उत्सव काढण्यात येत असतो.यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त देखील या छबिना उत्सवात हजर असतात. या छबिना उत्सवात सिंह,गरूड,नंदी,
राजहंस,हत्ती,वाघ, घोडा,यापैकी एका वाहनावरती मेघडंबरी मध्ये देविची चांदीची उत्सवमुर्ती ठेवून त्यामध्ये चांदीच्या देविच्या पादूका ठेवून भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढली जात असते.गोंधळी आपले संबळाच्या वाद्याने व भक्तगण आई राजा उदो उदो च्या जयघोषात हा छबीना उत्सव पार पाडला जात असतो.
मंदिरच्या इतिहासात प्रथमच भक्ताविना हा छबिना सोहळा पार पाडावा लागला.या नवरात्र महोत्सवातील पहिला छबीना हा देविच्या गरूड वाहनावरती पार पडला यावेळी मंदिरचे जयसिंग पाटील,विश्वास कदम,विनोद सोंजी,जगदिश पाटील,सुधीर कदम,मोजकेच मंदिर व पोलीस कर्मचारी हजर होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती छबिना उत्सव पुर्वीप्रमाणे गर्दी न करता कमीतकमी लोकांचा सहभाग घेऊनच शांततेत हा धार्मिक विधी पार पडला.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.