संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी संतोष शिंदे यांची निवड!

Spread the love

परवेज मुल्ला
उस्मानाबाद : संतोष शिंदे यांनी महाविद्यालयात विद्यार्थी दशेपासून संभाजी ब्रिगेड मध्ये गेली सतरा-अठरा वर्षापासून काम करत आहेत. पुण्यातील प्रत्येक चौकामध्ये आंदोलन केली असल्याचा इतिहास आहे. जेम्स लेन तथा भांडारकर आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच रायगडवर मेघडंबरी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलने, दादोजी कोंडदेव पुतळा हटवला, एसटी कामगारांसाठी आंदोलन, पुणे महानगरपालिके समोर वेगवेगळी अंदोलने, गडकरी पुतळा प्रकरण, डीएड विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन, पाठ्यपुस्तकातील चुकीचा व खोटा इतिहास गळणे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.

‘नोटबंदी’ विरोधात देशातील केंद्र सरकार विरोधातील पहिले आंदोलन पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजीनगर येथे करण्यात आले. इतिहासातील संस्कृतीत दहशतवाद, सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न याबाबत संतोष शिंदे यांनी सातत्याने आवाज उठवला. पुण्यामध्ये पुणे शहर सरचिटणीस, जिल्हा कार्याध्यक्ष व ‘पुणे जिल्हाध्यक्ष’ या पदावर सक्षमपणे संघर्घात्मक नेतृत्व सिद्ध केले. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी व सर्व बहुजन समाजासाठी हक्काचा आवाज म्हणून संतोष शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.

‘संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र स्तरावर सर्वांना सोबत घेऊन शिस्तबद्ध पध्दतीने उत्तम रित्या काम करेल. लोकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करत राहील. शेतकरी, कष्टकरी, भटके-विमुक्त, दलित, पीडित, शोषित व संपूर्ण बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व सर्व समाजाच्या हितासाठी दिवस-रात्र काम करण्याचा प्रयत्न करेल. समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा मोलाचा सहभाग असेल. दिवस-रात्र एक करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘संभाजी ब्रिगेड’ पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

संभाजी ब्रिगेडचे मजबूत संघटन व कार्यकर्ता सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असेल. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेल्या जबाबदारी’चा मी नक्कीच सोने करण्याचा प्रयत्न करेल. प्रामाणिकपणे व कुठलाही राग, द्वेष, मत्सर मनात न ठेवता सर्वांना सोबत घेऊन काम करेल. संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांचे हात मजबूत करण्यासाठी व महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कॅडर बेस कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न असेल असे आश्वासन त्यांनी दिले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.