टिपू सुलतान ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी अकिब पटेल

Spread the love

परवेज मुल्ला
उस्मानाबाद :कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अकिब पटेल यांची टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतंच त्यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जहिरोद्दीन पठाण यांनी निवडीचे पत्र दिले आहे. अकिब पटेल हे मागील काही वर्षांपासून कळंब शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यापूर्वी त्यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, टिपू सुलतान जयंती, मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले आहेत. सुरवातीला कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले होते.

त्यामुळे ज्यांचे हातावरचे पोट आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती यावेळी 200 पेक्षा जास्त गरजू लोकांना त्यांनी आगाज फाउंडेशनच्या माध्यमाने रेशन किटचे वाटप केले होते. तसेच शहरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा अग्रगण्य सहभाग असतो. याच कार्याची दखल घेऊन त्यांची टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. देशसेवेसाठी आणि मानव सेवेसाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन दिलेल्या नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे. या निवडीबद्दल पटेल यांचे शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात येत आहे.

Google Ad

13 thoughts on “टिपू सुलतान ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी अकिब पटेल

  1. I all the time emailed this website post page to all my contacts, because if like to read it after that my contacts will too. Amye Merv Car

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.