जिद्दीला सलाम; पुण्यात मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाने ३५ दिवस मृत्यूशी लढा देऊन जिंकली कोविडची लढाई !

Spread the love

पुणे | मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने ३५ दिवस संघर्ष करत कोरोनावर मात केल्याचा चमत्कार पुण्यातील भारती रुग्णालयात घडला आहे. गर्भवती महिला या उच्च जोखिम गटात येत असल्याने या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातच आई जर कोविड-१९ पॉझीटीव्ह असेल तर त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते, कारण हा आजार आईकडून बाळास जाईल की नाही या बाबत असलेले कमी ज्ञान. कोरोना व्हायरस- २ हा आईकडून बाळास होण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे, परंतु अशा अतिशय कमी केसेस आहेत. सुदैवाने जगभर बहुतांश वेळा कोविड- १९ पॉझीटीव्ह आईचे बाळ हे कोणत्याही लक्षणाशिवाय जन्मलेले आहेत.

पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत अपवाद हे असतात. अशीच घटना घडली एका खाजगी रूग्णालयात. मुदतीच्या आधी एका आईने बाळास जन्म दिला ज्याचे जन्माच्या वेळी वजन फक्त १.८ किलो होते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता व ऑक्सिजन देण्याची गरज होती व हे बाळ तपासणीअंती कोविड- १९ पॉझीटीव्ह आले. भारती हॉस्पिटल नवजात शिशु अतिदक्षता विभाग अशा बाळासाठी लागणा-या सुविधा व तज्ञ डॉक्टरची उपलब्धता असणारा असल्याने स्वभावत: त्यांनी येथे संपर्क साधला व सुरु झाली जीवन मृत्यूची लढाई.

अशा जन्मजात बाळांसाठी आपल्या साधारण रुग्णवाहिकेपेक्षा वेगळ्या स्पेशल रुग्णवाहिकेची गरज लागते. सुदैवाने अशी रुग्णवाहिका भारती हॉस्पिटल येथे उपलब्ध असल्याने त्यातून बाळास भारती हॉस्पिटल येथे आणण्यात आले. पुढील दोन दिवसात हळूहळू श्वासोच्छवासाची अडचण वाढत गेली व बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी बाळाला फुफ्फुसात ‘सर्फेक्टंट’ नावाच्या विशेष औषधाचे दोन डोसही देण्यात आले. हे सर्व होऊनही, बाळाला १००% ऑक्सिजन आवश्यक होते आणि त्याला हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटर या विशेष प्रकारच्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक विशेष वायू देखील वापरला गेला. एक विशेष थेरपी (इंट्रावेनस इम्युनोग्लोबुलिन) देखील दिली गेली, जे रोगप्रतिकारक शक्तीस मदत करते.

एक्स रेमध्ये दोन्ही फुफ्फुसांत विस्तृत पसरलेला न्यूमोनिया दिसत होता. प्रौढांमधे कोविड -२ ची जी गंभीर लक्षणे दिसून येतात त्यासारखेच हे होते. बाळाच्या रक्ताच्या सर्व तपासण्या ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असल्याचे सूचित करत होत्या. बाळ आणि आई दोघांमध्येही कोविड-२ अँटीबॉडी टेस्ट पॉझीटीव्ह आली, म्हणजे आईलाही कोविड होऊन गेला होता. पंरतु आईला कोविड-२ ची कोणतीही लक्षणे नव्हती (हे कोरोना व्हायरस -२ मुळे होऊ शकते) . रोगाच्या तीव्रतेमुळे आणि पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बाळाला ५ दिवस उच्च डोस स्टिरॉइड्स (मेथिलप्रेडनिसोलोन) दिले गेले त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.

बाळ २२ दिवस व्हेंटिलेटरवर राहिले, त्यापैकी हाय फ्रीक्वेंसी वेंटिलेटर १६ दिवसांच्या कालावधीसाठी होते, ही एक अपवादात्मक घटना आहे. अखेरीस २५व्या दिवशी बाळास व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. या टप्प्यावर, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात काही फायब्रोसिस दिसून आले, अशा प्रकारचे फायब्रोसिस गंभीर कोविड-२ मधून ब-या झालेल्या काही प्रौढ रुग्णामध्ये दिसून आले आहेत. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरपीनंतर, ३५ व्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले. मुदतपूर्व जन्मलेल्या लहान बाळाची ही एक अनोखी घटना आहे, ज्याला गंभीर कोविड -२ disease या आजाराने ग्रासले होते आणि जवळजवळ तीन आठवड्यांच्या व्हेंटिलेटर सपोर्ट आणि स्टिरॉइड्सच्या उच्च डोसने (काही प्रमाणात नुकसान झाले तरी) बाळ वाचू शकले.

अशा प्रकारच्या गंभीर आजाराची मुदतपूर्व जन्मलेल्या छोट्या बाळांमध्ये जगात कोठेही नोंद झालेली नाही. आपल्याला माहित आहे की, लहान मुलांमध्ये प्रौढांपेक्षा कोणत्याही आजारापासून बरे होण्याची प्रचंड क्षमता आहे जे चांगले आहे. आम्हाला आशा आहे की काही काळात बाळ या भयानक आजारामुळे झालेल्या नुकसानीवर मात करेल. भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि टीमला मनःपूर्वक धन्यवाद !

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.