रिटेवाडी च्या गावच्या ग्रामस्थांच रस्त्याच्या माणगीसाठी उपोषण; प्रशासनाचा हलगर्जीपणा!

Spread the love

करमाळा | रिटेवाडी हे एक उजनी धरणग्रस्त पुनर्वसन केलेल गाव पण गावाला जाईल रस्ता नसल्या मुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींनासामना करावा लागत आहे प्रशासनाला वेळोवेळी मागणी केली असता कोणतीही दखल घेतली गेली नाही म्हणून ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषणकर्त्या ची तब्यत ढासळली आहे. कार्यकारी अभियंता पुर्नवसन सोलापूर मा.वाडकर साहेब
सहाय्यक उपउभियंता राठोड साहेब यांनी भेट देऊन चर्चा केली , त्यांनी दिलेल्या पोकळ आश्वासन ग्रामस्तांनी फेटाळून लावली.व उपोषण पुढे चालूच ठेवले

सभापती ननवरे साहेब, रिपाईचे नागेश कांबळे,जि प सदस्य आवटे,प्रहार संघटनेचे अनारसे मॅडम, तात्यासाहेब सरडे ,पं स सदस्य अतुल पाटील, उपसभापती सरडे साहेब,नेते पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी चे  तालुकाध्यक्ष सतोंष वारे,तानाजी झोळ,उमरड चे सरपंच संदीप पाटील,करमाळा व परिसरातील संघटना
याणी भेट देऊन पाठींबा दिला

काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ठासाळली आहे..तरी कोणत्याच वैदकीय अधिकरी व प्रशासन यांनी लक्ष दिलेले नाही.. तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिवसभर शहरात असून देखील ही त्यांनी उपोषण स्थळी भेट देण्याचे टाळले. तसेच कोणत्याच माजी आमदारांनाही देखील रिटेवाडी चे उपोषण स्थळी भेट देणे म्हत्वाचे वाटले नाही.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.