पुणे जिल्हा आणि पुण्यात रक्ताचा मोठा तुटवडा; कोरोना पेशंटचे होत आहेत हाल, निगेटिव्ह रक्तगटासाठी रुग्णांची वनवन!

Spread the love

पुणे | माझे मामा ‘डायलेसिस’चे रूग्ण आहेत आणि ते 60 वर्षाचे असून गेल्या 4 ते 5 दिवसांपासून के एम रूग्णालयात ऍडमिट होते. तर बुधवारी रूग्णालयातून सांगण्यात आले की, त्यांचे ‘हिमोग्लोबिन’ कमी झाले असून त्यांना तातडीने रक्त चढवण्याची गरज आहे. यासाठी अम्हाला ‘ए’ निगेटिव्ह या रक्ताची गरज होती. पुण्यातील सर्व रुग्णालय आणि ब्लड बँकमध्ये चौकशी केली मात्र या प्रकारचा रक्तसाठा कुठेही उपलब्ध नव्हता. खूप प्रयत्न केल्यानंतर एक रक्ताच्या बॅगेची जुळणी शक्य झाली, पण त्याची ‘एक्सपायरी डेट’ तीन दिवसांनी संपणार होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्या रक्ताचा वापर केला नाही. त्यात नागरिकसुद्धा रक्तदानाला बाहेर पडण्यास घाबरत असल्याने मात्र या रक्त गटाचा शोध कसा लावू याच चिंतेत होतो, तेव्हा शिवशंभू ब्लड फौंडेशन बाबत समजले. या अभियानामुळे आज माझ्या मामांना वेळेत रक्त मिळाले. अशी माहिती 22 वर्षीय शुभम चव्हाण या तरूणाने दिली

शुभम चे मामा हे गेल्या 3 वर्षांपासून डायलिसिस करत आहेत. त्यांना यापूर्वी रक्तासाठी कोणतीही अडचण उद्भवली नाही. दरम्यान सध्या कोरोनामुळे रक्तदान शिबिरांची संख्या पूर्ण कमी झाली असून पुण्यातील रक्तपेढ्या आणि रुग्णालयांमध्ये रक्तसाठा कमी झाला
असून पवार कुटुंबीयांना याचा अनुभव मिळाला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून समाजमाध्यमांद्वारे पुण्यात रुग्णांसाठी रक्ताची मागणी केली जात आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी निगेटिव्ह रक्त गटाची मागणी सर्वाधिक असल्याचे दिसून आले.

याबाबत माहिती देताना शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या अंतर्गत शिवशंभू ब्लड फाऊंडेशन’चे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषन सुर्वे म्हणाले, “यंदा कोरोनामुळे रक्तशिबिरांची संख्या कमी झाल्याने शहरातील मोठमोठ्या रूग्णालयांमध्ये रक्ताची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातही आम्ही कोरोनाच्या काळात जवळपास90 रक्तदान शिबिर घेऊन हातभार लावला होता परंतु आता कोरोनाचे संकट वाढत असल्याने शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या अंतर्गत पुर्न पुणे जिल्ह्यात आणि शहरात रक्तदान शिबिराची मोहिम राबविण्यात येत असून समाजमाध्यमातून आम्ही लोकांना रक्तदान करण्याची मागणी करत आहोत. त्याचप्रमाणे रक्तदानाचे अप्लिकेशन काढण्यात आले असून आपणही आत्ता ते डाऊनलोड करून आपली माहिती रजिस्टर करावी..
• आजच अॅपलिकेशन डाउनलोड करा आणि रक्तदानासाठी आपणही हातभार लावा ॲप्लिकेशनची लिंक:

https://play.google.com/store/apps/details?id=in.blooddoner

•आम्ही ससून रुग्णालयातून लोकांना मोफत रक्ताची बॅग दिली जाते, परंतु कोरोनाच्या भीतीने ससूनमध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे तरी आपण स्वयंपूर्तीने रक्तदान शिबिर घेऊन ससून हॉस्पिटल ला हातभार लावावा.
– शरद देसले, समाजसेवा अधीक्षक, ससून ब्लड बँक पुणे

•कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक रक्तदान करण्यास घराबाहेर
पडायला घाबरत आहेत. त्यामुळे रक्त संकलन कमी झाले असून
फक्त रुग्णालयातच नाही, तर विविध बल्ड बँकमध्ये रक्ताचा तुटवडा होत आहे. तसेच एकूण रक्तदान प्रक्रिया कमी झाल्याने निगेटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांना शोधणे म्हणजेच तारेवरची कसरत झाली आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज असून सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करावे.
– संजय शिंदे, संचालक, अक्षय रक्तपेढी-हडपसर

•कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनीसुद्धा
प्लाझ्मा दान करावा. सध्या शहरातील सर्व रक्तपेढ्यांतर्फे
लोकांना याबाबात आवाहन केले जात आहे.
पी. के. शिंदे, संचालक, रेडपल्स रक्तपेढी, भोसरी

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.