भारतीय क्रिकेट विश्वाला मोठे धक्के; धोनी पाठोपाठ सुरेश रैनानेही केल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा.!

Spread the love

नवी दिल्ली | कॅप्टन कूल धोनीने पुन्हा एकदा सर्वांना अचानक धक्का देत निवृत्ती जाहीर केली. धोनीने एका इन्स्टाग्राम पोस्टमधून आपण निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्याने पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली. त्यासोबत धोनीने चाहत्यांचे आभार मानले असून एक व्हिडिओ शेअर केला आहे. धोनीने त्याचा शेवटचा सामना 9 जुलै 2019 ला न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 38 वर्षीय धोनी गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला बादझाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. त्यानंतर धोनीचे चाहते तो पुन्हा मैदानात कधी उतरणार याची आतुरतेनं वाट बघत होते. नुकतेच भारताच्या माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी ने निवृत्ती जाहीर केली आणि संपूर्ण क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला. त्यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या.

चेन्नई सुपरकिंग्ज मध्ये आणि अधी टीम इंडिया मध्ये एकत्र खेळणाऱ्या सुरेश रैनाने देखील धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पण शुभेच्छा देताना त्याने स्वतः देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. सुरेश रैनाने अनेकवेळा टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आहे आणि चेन्नई सुपरकिंग्ज साठी देखील त्याने धमाकेदार फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले आहे. एका पाठोपाठ एक दोन जबरदस्त खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट विश्वात एकाच खळबळ उडाली आहे आणि या दोघांच्या निवृत्तीने एक पोकळी निर्माण झाली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.